पुणे

मुठा खोर्‍यामध्ये पावसाची संततधार सुरू; टेमघर धरण 83 टक्के भरले

अमृता चौगुले

खारावडे; पुढारी वृत्तसेवा: मुळशी तालुक्यातील मुठा खोर्‍यामध्ये गेल्या आठवडाभर मुसळधार पाऊस पडत असल्याने टेमघर धरण 83 टक्के भरले आहे. मुठा खोरे परिसरामध्ये 2452 मि. मी. पाऊस पडला आहे. परिसरातील सर्व नद्या, बंधारे, नाले, धबधबे पावसाच्या पाण्याने भरभरून वाहत आहेत. टेमघर धरण गळतीचे गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेले काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.

लवासा शहराजवळ असलेले हे टेमघर धरण पाहण्यासाठी परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पौड पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील दोन ते तीन दिवस असाच मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास टेमघर धरण शंभर टक्के भरेल, अशी माहिती उपविभागीय अभियंता हरिबा जाधव यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT