पुणे

माथवड चौक मृत्यूचा सापळा

अमृता चौगुले

पौड रोड : पुढारी वृत्तसेवा: माथवड चौकात मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघातांचा धोका वाढला आहे.
महापालिकेच्या वतीने माथवड चौकात दोन महिन्यांपूर्वी पाइपलाइन टाकल्यानंंतर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, दोन महिन्यांतच हा रस्ता उखडल्याने महापालिकेचा निधी वाया गेल्याचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला आहे. माथवड चौक व लगतचा रस्ता रहदारीचा आणि वर्दळीचा आहे. येथे पादचारी, लहान-मोठ्या गाड्या नेहमी ये-जा करीत असतात. गेल्या काही महिन्यांपासून या चौकात पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

याच रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने नागरिक आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. या परिसरात लहान-मोठ्या सोसायट्या तसेच काही अंतरावर शाळा-कॉलेज आहेत. गर्दीचा हा रस्ता पुढे पौड रोडला जोडला असल्याने या रस्त्यावरून दिवस-रात्र विद्यार्थी, विविध क्षेत्रांत काम करणार्‍या नागरिकांच्या वाहनांची वर्दळ असते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्यामुळे या रस्त्याने ये-जा करणार्‍या वाहनचालकांनी प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. जागरूक नागरिकांनी अपघात टाळण्यासाठी तेथे झाडाच्या फांदीला लाल कापड तसेच फायबर बॅरिकेड लावले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT