पुणे

माजी मंत्री राम शिंदे आजपासून बारामती दौर्‍यावर; भाजपकडून संघटनात्मक बांधणीवर भर

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा: भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक बांधणी करण्यासह केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे व कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्याअंतर्गत शनिवारी व रविवारी (दि. 3 व 4) लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी आमदार राम शिंदे हे बारामती दौर्‍यावर येत असल्याची माहिती पक्षाच्या प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी दिली. शिंदे यांच्यापाठोपाठ दि. 6 रोजी बावनकुळे, तर सप्टेंबरअखेरीस ना. सीतारामन बारामती दौर्‍यावर येत असल्याचे ते म्हणाले.

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काळे यंनी ही माहिती दिली. या वेळी अविनाश मोटे, पांडुरंग कचरे, सतीश फाळके, रंजन तावरे, अ‍ॅड. जी. बी. गावडे, दादासाहेब कोकणे आदी उपस्थित होते. काळे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्वर्भूमीवर पक्षबांधणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गत लोकसभा निवडणुकीत देशातील 144 व राज्यातील 16 मतदारसंघांत भाजपचा पराभव झाला होता. तेथे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

शनिवारी व रविवारी माजी मंत्री राम शिंदे हे बारामतीचा दौरा करणार आहेत. मंगळवारी (दि. 6) प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बारामती दौर्‍यावर येत आहेत. बावनकुळे हे तालुक्यातील बुथ कमिट्या, सोशल मीडिया टीम, प्रमुख पदाधिकार्‍यांना भेटणे तसेच माळेगाव व काटेवाडी या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गावांमध्ये बुथ कमिटीच्या बैठका घेणार आहेत. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी सर्व निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT