पुणे

महिलांनी स्वावलंबी बनावे : आयुक्त राजेश पाटील

अमृता चौगुले

दापोडी : महिलांनी स्वतःच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने व आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने विविध क्षेत्रात काम करुन स्वावलंबी बनावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी दापोडी येथे व्यक्त केले. महापालिका 'ह' क्षेत्रीय कार्यालय नवी दिशा प्रकल्पांतर्गत बचत गटातील महिलांना सामुदायिक शौचालय देखभाल व दुरूस्ती कामकाजाचे कार्यादेश पत्राचे वाटप आनंदवन, कष्ठवसाहत दापोडी फुगेवाडी या ठिकाणी आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी आयुक्त राजेश पाटील बोलत होते. दापोडी येथील प्रेरणा महिला बचत गट, रमाई महिला महिला बचत गट, संकल्प महिला बचत गट आदी बचत गटाच्या महिलांना कार्यादेश पत्राचे वाटप करण्यात आले. या वेळी ह क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, समाजविकास अधिकारी बहादूरपुरे, सहायक आरोग्य अधिकारी महेश आढाव, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, रवींद्र तनपुरे यांसह अन्य अधिकारी व महिला मोट्या संख्येने उपस्थित होत्या.

महिलांना रोजगाराची संधी मिळावी. महिलांची आर्थिक उन्नती व्हावी, त्यांच्या हाताला काम मिळावे या हेतूने हा महापालिकेच्यावतीने नवी दिशा प्रकल्प योजना राबविली जात आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी या प्रकल्पातून मिळते.
– महेश आढाव,
सहायक आरोग्य अधिकारी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT