पुणे

महिला पोलिस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की; दोन महिलांना अटक

अमृता चौगुले

पुणे : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, खडक पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.याबाबत एका महिला पोलिस कर्चमार्‍याने फिर्याद दिली आहे.

त्यानुसार संबंधित महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आल आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी पावणे चार वाजताच्या सुमारास काशेवाडी परिसरात घडली आहे. फिर्यादी पोलिस कर्मचारी महिला या दामिनी मार्शल म्हणून कर्तव्यावर होत्या. त्यावेळी नियंत्रण कक्षाकडून काशेवाडी पोलिस चौकी या ठिकाणी पोलिस मदतीची गरज असल्याचे त्यांना कळविण्यात आले होते.

त्यानुसार फिर्यादी महिला त्यांच्या सहकारी कर्मचारी महिलेसोबत तेथे गेल्या. आरोपी महिलांच्यामध्ये भांडणे सुरू होती. त्यांच्यातील भांडणे फिर्यादी व त्यांच्या सहकारी कर्मचारी महिलेने सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी महिलांनी त्यांना शिवीगाळ करून त्यांचे केस जोरात ओढले. हा प्रकार घडल्यानंतर आरोपी महिलांना पोलिस चौकीत आणण्यात आले होते. तेथेदेखील त्यांनी पोलिस कर्मचार्‍यासोबत अरेरावी केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT