पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'सीएसके आयस्क्वॉश करंडक' खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेच्या विविध गटांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला. ही स्पर्धा मुंढवा येथील चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे बुधवारपासून सुरू झाली. स्पर्धेमध्ये भारतातील 21 राज्यांतील 563 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 15 वर्षांखालील गटाच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या अथर्व मेंढे याने नवव्या मानांकित झारखंडच्या विराज जयस्वाल याच्यावर संघर्षपूर्ण विजय नोंदविला.
अथर्वने विराजचा 14-12, 11-6, 3-11, 3-11, 11-9 असा पाच सेटमध्ये पराभव केला. याच गटात पश्चिम बंगालच्या विहान छलान याने महाराष्ट्राच्या स्वर साबू याच्यावर 12-10, 11-5, 9-11, 11-6 असा विजय मिळवला. आतिक यादव या महाराष्ट्राच्या खेळाडूने चंदीगढच्या उचित सोनी याचा 9-11, 11-5, 11-7, 12-10 पराभव केला. महाराष्ट्राच्या अमेश दत्ता याने उत्तर प्रदेशच्या विहान गुप्ता याचा 11-1, 11-2, 11-9 असा सहज पराभव केला.
स्पर्धेचे निकाल : पहिली फेरी ः 11 वर्षाखालील गट ः अरमान चौधरी (महा) वि.वि. केतन सांब—े (महा) 11-5, 11-7, 4-11, 11-8, कौशल सिंघवा (महा) वि.वि. अंश मल्होत्रा (महा) 11-2, 11-1, 11-3, रोहन दरवाडा (महा) वि.वि. सांश मल्होत्रा (महा) 11-1, 11-0, 11-1, सिद्धांत रंजीथ (महा) वि.वि. मोहन सिंगवा (महा) 11-4, 11-2, 11-3.