महर्षीनगर : शहरात शाळांची सुरुवात 15 जूनपासून झाली. त्यापूर्वी शाळांची साफसफाई होणे अपेक्षित होते. याकरिता क्षेत्रीय कार्यालयाची मदत घेता येते. शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी या कामासाठी पगारी असतात. महर्षीनगरमधील संत ज्ञानेश्वर प्रशालेतील मुख्य इमारत व नाला भिंत यामध्ये साफसफाई झाली नसून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता पालकांकडून वर्तवली जात आहे.
या विभागाचे शाळा शिक्षण प्रमुख सुभाष सातव यांना माहिती विचारली असता, त्यांनी आज दुपारी शाळेत येऊन माहिती घेतो, पुढील स्वच्छतेची कार्यवाही करू, असे सांगितले. माजी नगरसेवक शाळेच्या पहिल्या दिवशी येऊन मुलांचे स्वागत करण्याची चमकोगिरी करतात, मग स्वच्छतेचे काम कुणी पाहायचे? शाळा प्रशासनाने या बाबी पाहणे अपेक्षित आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष होत आहे.