पुणे

मधमाश्या पालन जनजागृती मेळावा उत्साहात

अमृता चौगुले

कार्ला : वाकसई येथील संत तुकाराम महाराज पादुका स्थान मंदिरात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामउद्योग मंडळ कार्यालय पुणे यांंच्यावतीने कार्ला परिसरातील शेतकर्‍यांसाठी मधकेंद्र योजना व मधमाश्या पालन जनजागृती करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी जिल्हा ग्रामउद्योग आधिकारी ध्रुवकुमार बनसोडे यांनी शेतकर्‍यानां मार्गदर्शन केले. सहायक जिल्हा ग्रामउद्योग आधिकारी अमर राऊत यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती तसेच पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेची माहिती दिली. या वेळी लोणावळा येथील उद्योजक पद्मकुमार देसाई, माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे, खरेदी विक्री संघ माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, वाकसई देवघर माजी सरपंच भरत येवले, राष्ट्रवादीचे काग्रेस सहकार आघाडीचे अध्यक्ष नंदकुमार पदमुले यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT