पुणे

भोसरी : ई क्षेत्रीय कार्यालयात ध्वज विक्रीस प्रारंभ

अमृता चौगुले

भोसरी : शहरात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये 'घरोघरी तिरंगा' हा उपक्रम पालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत भोसरीतील ई क्षेत्रीय कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीस उपलब्ध करून देण्यात आला आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची भावना जनमानसात कायमस्वरूपी राहावी यासाठी 'घरोघरी तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ई क्षेत्रीय कार्यालयात या अभियानाची सुरुवात झाली. याप्रसंगी क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, प्रशासन अधिकारी नाना मोठी, कार्यलयीन अधीक्षक ढवळे, राजेश भट व कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. पदयात्रेचे नियोजन, घरोघरी तिरंगा उपक्रमविषयक जनजागृती, प्लॉगेथॉन मोहीम, प्लास्टिक बंदीबाबत शपथ घेणे, सिंगल युज प्लास्टिक विरोधी विशेष मोहीम, कापडी पिशवी वाटप व सेल्फी मोहीम, फळ-भाजी विक्रेते, टपरी-हातगाडी विक्रेते व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT