भोर; पुढारी वृत्तसेवा: भोर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्याला शुक्रवारी (दि. 2) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाने झोडपले असून, ओढ्या-नाल्यांना पाणी वाढले आहे. जोरदार पावसामुळे शेतात काम करणार्या शेतकर्यांचे मोठे हाल झाले.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वीसगाव व चाळीसगाव खोरे परिसरात शुक्रवारी (दि. 2) दुपारपासून ढगाळ हवामान तयार होऊन सायंकाळी पाचच्या दरम्यान ढगांचा गडगडाट तसेच विजेच्या कडकडाटांसह पाऊस अर्धा तास जोरदार बरसला.
या पावसाने ओढ्या-नाल्यांच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, भातखाचरांतही पाणी साचले आहे. पावसामुळे भात पीक जोमात येणार असले, तरी कडधान्य पीक वाया जाण्याची भीती शेतकर्यांना आहे.