पुणे

भरमसाट शुल्कावरून विद्यापीठ बंदचा इशारा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भरमसाट वाढलेल्या शुल्कासह अन्य मागण्यांसंदर्भात सलग दुसर्‍या दिवशीही भर पावसात विद्यार्थ्यांचे बेमुदत घंटानाद आंदोलन सुरूच आहे. या सर्व आंदोलक विद्यार्थ्यांनी मंगळवारी विद्यापीठ परिसरात शुल्कवाढ जनजागृती रॅली काढत बुधवारी (दि. 13) विद्यापीठ बंदचा इशारा दिला आहे.

आंदोलक विद्यार्थ्यांनी मंगळवारी विद्यापीठ आवारात शुल्कवाढ जनजागृती रॅली काढली. यात सर्व विभाग, ग्रंथालय, भोजनालय, मुलांचे-मुलींचे वसतिगृह आदींना भेटी दिल्या. रॅलीदरम्यान आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत संवाद साधला. ही लढाई योग्य असून, या आंदोलनास माझा पूर्ण पाठिंबा आहे.

तसेच कुलगुरूंची भेट घेऊन यावर लवकरच तोडगा काढायला सांगू आणि यावर मार्ग काढला नाही, तर माझ्यासह संपूर्ण आझाद समाज पार्टी या आंदोलनात सहभागी होईल, असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. दरम्यान, आम आदमी पक्ष, एसपीपीयु टीचर्स असोसिएशन, विद्यार्थी दलित पँथर, युवक क्रांती दल, एस.एफ.आय., लोकायत, नेट-सेट-पीएच.डी.धारक संघर्ष समिती आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला.

विद्यार्थ्यांना हवे लेखी पत्र
कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि कुलसचिव यांनी आंदोलकांना भेट देऊन शुल्कवाढीसंदर्भात समिती नेमूण योग्य तो निर्णय घेऊ, असे तोंडी सांगितले. परंतु, या सर्व गोष्टी लेखी स्वरूपात हव्यात, असे आंदोलक विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT