पुणे

बोपोडीत खड्ड्यांचा सरेना त्रास

अमृता चौगुले

बोपोडी; पुढारी वृत्तसेवा: बोपोडीत रस्त्यांवर जागोजागी असलेले खड्डे अन् त्यात साचलेले पावसाचे पाणी यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमधून वाहन काढणे चालकांसाठी कसरतीचे होत असून, काही ठिकाणी तर वाहतूक कोंडी होत आहे. बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावर तर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त आहेत.

औंध रस्त्यासह आता बोपोडीतही जोरदार पावसामुळे रस्त्यांवर मोठे खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे पादचार्‍यांसह वाहनचालकांची त्रैधातिरपिट उडत आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी महापालिकेकडे केली आहे. हे खड्डे बुजविल्यावर वाहनचालकांच्या अडचणी सुटतील, त्यामुळे औंध रस्ता आणि बोपोडीतील खड्ड्यांचा प्रश्न कायमचा सुटेल, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

SCROLL FOR NEXT