बेल्हे : पुढारी वृत्तसेवा : मंगरूळ (ता. जुन्नर) श्रीरामनगर शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंज-यात गुरुवारी (दि.1) पहाटे पूर्ण वाढ झालेला बिबट्या वनविभागाच्या पिंज-यात अडकला. मंगरूळ परिसरात वनविभागाच्या पिंजर्यात अडकलेला या वर्षातील हा पहिला बिबट्या आहे. त्याला माणिकडोह बिबट्या निवारा प्रकल्पात हलविल्याचे बेल्हे वनपाल राजलक्ष्मी वीर यांनी सांगितले. मंगरूळ शिवारात श्रीरामनगर परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या गुरुवारी पहाटे पिंजर्यात अडकला.
मंगरूळ परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला. बाजीराव लामखडे यांच्या घराशेजारील गोठ्यात प्रवेश करत दोन शेळ्यांचा फडशा पाडला. दुसर्या दिवशीच श्रीरामनगर येथील लामखडे यांच्या घरासमोर तासभर ठिय्या मारून पाच शेळ्यांचा
फडशा पाडला. श्रीरामनगर शिवारात ज्या ठिकाणी गुरुवारी पहाटे बिबटया पिंंजर्यात अडकला आहे त्या शेतकर्याच्या एकाच आठवडयात चार शेळ्या त्याने ठार केल्या होत्या. त्यामुळे तेथे पिंजरा लावला होता.