ताथवडे : येथील ताथवडे -रावेत बीआरटी रस्त्यावरील धोकादायक चेंबरवरील झाकण बसवण्यात आले आहे. ताथवडे- रावेत मुख्य रस्त्यावरील चेंबरचे झाकण गायब याबाबतचे वृत्त 'पुढारी' मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या संबंधित विभागाकडून येथील चेंबरवर झाकण बसविण्यात आले आहे.
ताथवडे- रावेत या वर्दळीच्या रस्त्यावरील चेंबरचे झाकण गायब झाले होते. त्यामुळे वाहनचालकांना अपघातास सामोरे जावे लागण्याची शक्यता होती. चेंबर जास्त खोल असल्यामुळे त्यावर त्वरित झाकण बसविणे गरजेचे होते; मात्र याकडे महापालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लष होत होते. या गोष्टीची दखल घेत 'पुढारी'मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या संबंधित विभागाकडून येथील चेंबरवर झाकण टाकण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांचा धोका टळला असून, परिसरातील स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.