पुणे

बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयासमोर टाकला जातोय कचरा

अमृता चौगुले

बिबवेवाडी : बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या विभागीय उपकार्यालयासमोरच शेजारील मॉल्स, सोसायट्यांतील कचरा टाकला जात आहे. त्याचा त्रास होत असल्याची तक्रार जवळच असलेल्या संरक्षण लेखापरीक्षण विभागाच्या निवासी रहिवाशांनी केली आहे. क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाणार्‍या कर्मचारी आणि नागरिकांनाही त्याचा त्रास होत आहे.

गंगाधाम चौकापासून कोंढवा रोडवर जाताना रविराज मॉलमध्ये पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त यांचे विभागीय उपकार्यालय आहे व याच इमारतीमध्ये अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आणि इतर कार्यालयेही आहेत. या ठिकाणी कचरा साठतच असल्याने भिंतीलगत असलेल्या संरक्षण खात्याच्या लेखापरीक्षण विभागाचे कर्मचारी यांच्या निवासी खोल्या आहेत. त्यांनी वारंवार तक्रार करूनसुद्धा येथील कचर्‍याचा प्रश्न सुटत नाही, असा आरोप या कर्मचार्‍यांनी केला.

'या ठिकाणच्या कचर्‍याबाबत तक्रारी आल्यामुळे कचरा टाकणार्‍या मॉलमधील संबंधित व्यवस्थेला आम्ही पाच हजार रुपये दंडाची कारवाई केली असून, यापुढे येथे कचरा टाकणार्‍यांवर कारवाई केली जाईल.'

– अनिल सोनवणे, प्रभारी सहायक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT