पुणे

बाप्पाच्या आवडीचे मोदक बाजारात

अमृता चौगुले

पिंपळे गुरव : पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव जवळ आल्यामुळे बाजारपेठेत गणपतीच्या आवडीचा पदार्थ मोदक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये खवा, मावा, आंबा, पिस्ता, स्ट्रॉबेरी मोदक आदी प्रकारांचे मोदक विक्रीसाठी असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
गणपती बाप्पा आगमनाची तयारी जशी घरामध्ये सुरू असते तशी स्वयंपाकघरात गणपतीच्या आवडीचे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू असते. गणपतीच्या आवडीच्या पदार्थामध्ये मोदकाचा आवर्जून उल्लेख केला जातो.

बाजारात मोदकचे वेगवेगळ्या प्रकार उपलब्ध आहेत. सत्यनारायण प्रसाद मोदक आठशे रुपये किलो, पान मोदक 760 रुपये किलो, बनारसी पान मोदक, राज भोग मोदक 750 रुपये किलो दरात परिसरातील दुकानांमध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. तांदळाच्या उकडीचे मोठ्या आकरातील 21 मोदक 500 रुपयांना तर लहान आकारातील 21 मोदक 400 रुपयांना; तसेच, मिठाई दुकानांमध्ये विविध प्रकारांतील मोदकही विक्रीस उपलब्ध आहेत.

गणेशोत्सवासाठी विविध मोदक विक्रीस आहेत. सध्या ग्राहकांकडून राजभोग या नवीन प्रकारातील मोदकाला सर्वांत मागणी आहे. सध्या वाढलेल्या महागाईमुळे मोदक बनविताना लागणार्‍या पदार्थांच्या दरात वाढ झाल्याने मोदकांच्या किमतमध्येही वाढ झाली आहे.
                                                            – संगीता कोळेकर, विक्रेत्या

SCROLL FOR NEXT