पुणे

बापरे! जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या इमारतीत नाग

अमृता चौगुले

दापोडी :  सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. कासारवाडी येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या इमारतीत विषारी नाग पकडण्यात आला. सामान्यत: नाग सर्प हा भारतात सर्वत्र अढळनारा साप आहे. जेव्हा ह्या सापा समोर काही संकट येते त्या वेळी हा साप फना काढून उभा रहातो. त्या संकटाला पळवण्याचा प्रयत्न करतो.

अशा वेळी समोरील संकट अर्थात समोर असलेला प्राणी ज्या दिशेने हालचाल करेल त्या दिशेने फना फिरवत असतो. बर्याच वेळा नागरिकांचा असा गैरसमज होतो की, हा साप गारूडी वाजवत असलेल्या पुंगीच्या तालावर डोलत आहे, पण हा पुर्णपणे गैरसमज आहे. साप फक्त त्याच्या समोर होणार्‍या हालचालीवर लक्ष करत असतात. अर्थात समोर होणार्‍या हालचालीस टारगेट करत असतात. सापांचा आणि गारूड्याच्या पुंगीच्या आवाजाचा काही संबंध नसतो.

नाग सर्प फणा काढण्यामागचे कारण म्हणजे फक्त समोरील संकटास घाबरवने व पळून लावने एवढाच आहे. कोनताही साप हा आपल्या भक्षा व्यतिरिक्त इतर कोनालाही दंश करत नाही. किंवा कोणी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला तरचं दंश करतो किंवा कळत नकळत त्याच्या अंगावर पाय पडला किंवा गवत काढते वेळी किंवा अडचणीतील काही सामान काढताना चुकून हातात दाबला गेला तरचं दंश करू शकतो.

तस पाहिलं तर संकटावर प्रतिकार करायला त्याच्या कडे दंश करणे एवढा एकच पर्याय आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच सर्पमित्रांना संपर्क करावा असे प्राणी मित्र विनायक बडदे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT