पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
एका व्यक्तीस बनावट अॅपवरून पैशांची मागणी करण्यात आली; तसेच पैसे देण्यास नकार दिल्यानंतर फिर्यादीच्या फोटोचा दुरुपयोग करून त्याद्वारे अश्लील व्हिडीओ बनवून तो नातेवाइकांना पाठविण्याची धमकी अॅपद्वारे देण्यात आली. ही घटना पिंपळे सौदागर येथील एका व्यक्तीसोबत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने एणङ-तढ ङज-छ या नावाचे बनावट अॅप बनवून फिर्यादी क्रिष्णा शिवा मिश्रा (26 रा. कुणाल आयकॉन, पिंपळेगुरव) यांना त्या अॅपच्या आधारे 3850 रूपये ऑनलाईनद्वारे पाठविले, असे खोटे सांगितले.
तसेच फिर्यादीस 7 हजार रूपयांची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यावर त्यांच्या फोटोचा गैरवापर करीत, अश्लील व्हिडीओ बनवून फिर्यादीच्या बहिणीस पाठविला. तसेच इतर नातेवाईकांसह मित्रांना पाठविण्याची धमकी दिली. फिर्यादीस आरोपीने एकूण विविध बारा मोबाईल क्रमांकावरून पैशांसाठी संपर्क साधला. आरोपीच्या विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात शनिवारी 4 जून रोजी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.