पुणे

बकरी ईदनिमित्त वाहतुकीत बदल

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शहरात बकरी ईदनिमित्त वाहतुकीला होणारा अडथळा टाळण्यासाठी शहरातील काही ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. गोळीबार मैदान चौक येथील ईदगाह या ठिकाणी दि. 10 जुलै रोजी सकाळी सहा वाजल्यापासून नमाज पठण पूर्ण होईपर्यंत मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक ते ढोले पाटील (सेव्हन लव्हज) चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

या पर्यायी मार्गाचा करा वापर
गोळीबार चौकातून डाव्या बाजूस वळून सीडीओ चौक पुणे उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक पुढे उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जाता येईल. लुल्लानगरकडून येऊन खाण्या मारुती चौकाकडे जाणारी वाहतूक खटाव बंगला चौक-नेपियार रोड-मम्मादेवी चौक किंवा वानवडी बाजार चौक-भैरोबानाला येथून किंवा गिरीधर भवन चौकातून इच्छितस्थळी जाता येईल. सॅलिसबरी पार्क-सीडीओ चौक-भैरोबानाला येथून इच्छित स्थळी जाता येईल. मम्मादेवी चौक, बिशप स्कूल मार्गे किंवा कमांड हॉस्पिटल मार्गे डायव्हर्शन करून पुढे इच्छित स्थळी किंवा नेपियार रोडने पुढे सीडीओकडे जाता येईल. प्रिन्स ऑफ वेल रोडने किंवा भैरोबानाला-वानवडी बाजार चौक येथून इच्छित स्थळी जाता येईल. लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून इच्छित स्थळी जाता येईल.

हे मार्ग असतील बंद
गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग तसेच सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक नमाज पठण काळात सकाळी 7 ते 10 वेळेत बंद राहिल. सेव्हन लव्हज चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूकही बंद असणार आहे. भैरोबानाला ते गोळीबार चौकाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथे बंद करून एम्प्रेस गार्डन व लुल्लानगरकडे वळविण्यात येणार आहे. कोंढवा परिसरातून गोळीबार मैदानाकडे येणार्‍या सर्व जड मालवाहतूक वाहनांवर व प्रवासी वाहतूक करणार्‍या जडवाहनांना या ठिकाणी येण्यास मनाई करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT