पुणे; पुढारी वृत्तसेवा:
ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पाच दिवसांपासून पुन्हा इन्फेक्शन झाल्याने सोमवारी (दि. 27) रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अनिकेत आमटे यांनी दिली.
सध्या त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना हेअरी सेल ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. डॉ. आमटे 8 जूनला बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका समारंभाला आले होते. त्या वेळी त्यांना ताप आला होता. तपासणीअंती त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले. अधिक चाचण्या केल्या असता, त्यांना सुरुवातीच्या टप्प्यातील रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले.