पुणे

पौड रोड भागात नागरिकांना मोकाट जनावरांचा त्रास

अमृता चौगुले

पौड रोड; पुढारी वृत्तसेवा: पौड रोडवर मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघात होण्याचा धोका असून, या जनावरांचा महापालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परिसरातील माथवड चौक, राजमाता जिजाऊनगर, शिवराय प्रतिष्ठान शाळेसमोरील परिसर आणि शिक्षकनगर परिसरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम महापालिकेकडून सातत्याने राबविली जात नसल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या जनावरांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वाहतुकीस देखील अडथळा होत आहे. या रस्त्यावर सोसायटया, हॉटेल, शाळा-महाविद्यालये असल्याने पादचारी, वाहनांची मोठी वर्दळ असते. यामुळे या जनावरांचा महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

SCROLL FOR NEXT