पुणे

पोलिस अधिकार्‍याने जपला प्रबोधनाचा वारसा

अमृता चौगुले

सुपे : पुढारी वृत्तसेवा: सुपे पोलिस चौकीचे पोलिस अधिकारी रवींद्र मोहरकर यांनी सलग अकरा वर्षे पंढरपूरची वारी करून समाजप्रबोधनाचा वारसा जपला आहे. मोहरकर हे जेजुरी (ता. पुरंदर) येथील रहिवासी असून, पोलिस असूनही अध्यात्माची आवड, असे विरळेच व्यक्तिमत्व आहे. मोहरकर सध्या सुपे पोलिस चौकीत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. गळ्यामध्ये तुळशीची माळ असणारे, आध्यात्माची आवड, सतत नामस्मरण अशी त्यांची दिनचर्या असते.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या दिंडी क्रमांक 1 मधून ऑन ड्यूटी ते पंढरपूरकडे रवाना होत आहेत. या अगोदर रवींद्र मोहरकर यांनी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या दिंडी क्रमांक 45 मधून 5 वर्षे, काशिनाथ महाराज दिंडी सोहळ्यातून रथाच्या पुढे 5 वर्षे अशी 11 वर्षे वारी केली आहे. जीवदया, व्यसनमुक्ती, अवयव दानाचे महत्त्व, झाडे लावा पर्यावरण वाचवा अशा विविध क्षेत्रांतही कार्यरत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT