पुणे

पुरंदर ग्रामपंचायतमध्ये शिवतारे गटाची मुसंडी

अमृता चौगुले

सासवड; पुढारी वृत्तसेवा: पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सिंगापूर व बहिरवाडी या दोन ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने मुसंडी मारली आहे. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली. सिंगापूर ग्रामपंचायतीत शिवसेनेने सातपैकी पाच जागा मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना दोन जागा मिळाल्या. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : विक्रांत सुरेश पवार, सौरभ दिलीप लवांडे, अर्चना राजाराम लवांडे, विशाल शांताराम लवांडे, संगीता हनुमंत वारे, चांगुणाबाई वाघमारे, मीना उरसळ.

बहिरवाडी ग्रामपंचायतीच्या सातपैकी चार जागा मिळवून शिवसेनेने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : शरद पढेर, संगिता भगत, दशरथ जानकर, पूजा चिव्हे, अमोल भगत, सुजाता भगत, स्वाती कोकरे. शिवतारे म्हणाले, 'मी पुरंदर-हवेलीचा आता आमदार नसलो, तरी आगामी काळात पुरंदर हवेलीच्या विकासासाठी महत्त्वाचे प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे'. पुरंदर तालुका भाजपचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT