पुणे

पुण्यातील ‘बीएसआय’ने शोधली अस्थमावरील रामबाण औषधी वनस्पती

Arun Patil

पुणे ; दिनेश गुप्ता : पुण्यातील भारतीय वनस्पती सर्वेक्षण अर्थात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (बीएसआय) अस्थमावरील अंतमूळ (टालोफ्लोरा अस्थमॅटिका) नावाची रामबाण औषधी वनस्पती केवळ शोधली नाही; तर तिचे जतन करून रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध करून दिली आहे. शहरातील नामवंत डॉक्टर या संस्थेच्या नावाने प्रिस्क्रिप्शन देऊन हे औषध रुग्णांना घेण्यास संस्थेत पाठवत आहेत.

शहरात भारतीय वनस्पती सर्वेक्षणचे (बीएसआय) 60 वर्षे जुने कार्यालय आहे. आवारात शिरताच सुंदर व दुर्मीळ वनस्पतींचे उद्यान तुमचे स्वागत करते. येथे नेमक्या कोणत्या वनस्पती आहेत, याची माहिती फक्त येथील शास्त्रज्ञांनाच आहे. बीएसआयमध्ये अस्थमावरील औषध मिळते, याची माहिती मिळताच संस्थेचे संचालक डॉ. ए. बेन्नीयामीन यांची भेट घेतली असता त्यांनी या औषधीवर संशोधन करणार्‍या डॉ. सी. आर. जाधव यांच्याकडे पाठविले.

वेलवर्गीय बहुगुणी वनस्पती

डॉ. जाधव यांनी सांगितले की, या वनस्पतीचे अंतमूळ हे आयुर्वेदातील नाव आहे. वनस्पतीशास्त्रातील (बॉटनी) नाव 'टायलोफ्लोरा अस्थमॅटिका' असून मराठीत ही वनस्पती अंतमूळ तसेच पीतमारी या नावानेही ओळखली जाते. ही वनस्पती दम्यासह त्वचा व संधिवातावरही गुणकारी आहे. ब—ाँकोडायलेटर म्हणजे श्वासनलिका रुंदावण्याचे गुणधर्म यात असल्याचे वनस्पतीची क्लिनिकल ट्रायल केल्यावर स्पष्ट झाले आहे.

काय आहे वनस्पतीत…

या वनस्पतीमध्ये टायलोफ्लोरिन नावाचे अल्कलॉईड आहे. अनेक क्लिनिकल ट्रायल्समध्ये याचा वापर नेमका कशासाठी करावा, हे कळले आणि या दरम्यान अस्थमा आजारावर ही वनस्पती प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. औषधी कंपन्यांनी या वनस्पतीच्या पानांचा काढा प्रमाणित केला असून त्यात 1 टक्का अल्कलॉईड असते.

SCROLL FOR NEXT