पुणे

पुण्यात फॅशन स्टुडिओची क्रेझ; स्टायलिश लूक, फॅशनेबल कपडे, फुटवेअरसाठी तरुणाईची पसंती

अमृता चौगुले

सुवर्णा चव्हाण

पुणे : एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल अन् त्यासाठी स्टायलिश कपडे, त्याला साजेसा मेकअप, फॅशनेबल फुटवेअर आणि अ‍ॅक्सेसरीज असा लूक एकाच छताखाली मिळाला तर…. हो, आता हे शक्य आहे…. कारण पुण्यात आता अशी सेवा पुरविणारे अनेक फॅशन स्टुडिओ उघडले असून, स्टायलिश लूकसाठी अन् फॅशनेबल कपड्यांसाठी तरुणी फॅशन स्टुडिओत जाण्याला प्राधान्य देत आहेत.

स्टायलिश लूकसह एखाद्या कार्यक्रमासाठी इव्हेंट मॅनेजमेंटची सेवाही स्टुडिओमार्फत दिली जात असून, फॅशन डिझायनर अन् फॅशन क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींनी सुरू केलेल्या फॅशन स्टुडिओचे संस्कृतीही आता पुण्यात रुजत आहे. याविषयी फॅशन क्षेत्रातील कार्यरत असलेले अभिनंदन देशमुख म्हणाले, 'पुण्यात आता फॅशन स्टुडिओची संकल्पनाही रुजत आहे.

खासकरून फॅशन डिझायनरकडून हे स्टुडिओज सुरू झाले असून, आपल्याला सूट करतील, असे कपडे, मेकअप, फुटवेअर आणि अ‍ॅक्सेसरीज डिझायनर सुचवितात. त्यामुळे एक संपूर्ण लूक मिळत असल्याने तरुणाई या स्टुडिओजमध्ये जात आहेत.

संकल्पना काय आहे?

फॅशन ब्युटिकच्या जोडीला आता फॅशन स्टुडिओही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. पुण्यात औंध, बाणेर, कल्याणीनगर, विमाननगर, कॅम्प, कोथरूड अशा विविध ठिकाणी असे फॅशन स्टुडिओ सुरू झालेले दिसतील. या स्टुडिओत फॅशन डिझायनरने तयार केलेले आपल्याला हवे तसे स्टायलिश कपडे पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्या आवडत्या पेहरावासोबत फुटवेअर, अ‍ॅक्सेसरीजसह त्याला साजेसा मेकअपही करून दिला जातो. त्याचबरोबर आपल्या एखाद्या इव्हेंटसाठी नृत्यदिग्दर्शन तसेच छायाचित्रण सेवाही पुरविली जात आहे, त्यानुसार पैसे आकारले जातात.

पुण्यात फॅशन स्टुडिओची संख्या वाढत आहे. हवा तसा पेहराव, मेकअपसह एखाद्या कार्यक्रमासाठी इव्हेंट मॅनेजमेंटपासून ते कार्यक्रमासाठी नृत्यदिग्दर्शन असे सारे काही एकाच छताखाली आपल्याला मिळते. फॅशन स्टुडिओत फॅशन डिझायनरमार्फत आपल्याला हवे ते कपडे डिझाईन करून दिले जातात. त्याशिवाय अ‍ॅक्सेसरीज आणि फुटवेअरसह त्याला साजेसा मेकअप करून दिला जातो. त्यामुळे आपल्या एखाद्या पार्टीसाठी किंवा कार्यक्रमाला जाण्यासाठी रेडी लूक मिळतो. याशिवाय एखाद्या कार्यक्रमासाठी छायाचित्रणापासून ते नृत्यदिग्दर्शनापर्यंतच्या सेवाही पुरवीत आहोत. पिंपरी-चिंचवड, कल्याणीनगर येथे आमचे स्टुडिओ आहेत. त्याला चांगला प्रतिसाद आहे.

                        – रवींद्र पवार, एका स्टुडिओचे संचालक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT