पुणे : पुढारी वृत्तसेवा : जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त गुरुवारी (दि. 28) 'हिपॅटायटीस-बी' या लशीचे दहा हजार डोस मोफत देण्याचा उपक्रम रोटरी डिस्ट्रिक 3131 चे गव्हर्नर रोट्रीयन डॉ. अनिल परमार यांनी हाती घेतला आहे.
'हिपॅटायटीस-बी'मुळे यकृताची काविळ, कर्करोग असे इतरही आजार होण्याचा धोका असतो. 'हिपॅटायटीस-बी'लशीचे तीन डोस घेतल्यास हे सर्व टाळता येते. त्यामुळे गरीब, गरजू व्यक्तींसाठी हा उपक्रम आयोजित केल्याचे रोगप्रतिबंधक आणि उपचाराचे समन्वयक रोट्रीयन डॉ. आनंद केंच आणि पल्लवी साबळे यांनी सांगितले.