File Photo  
पुणे

पुणे : सोमेश्वर देवस्थानच्या पुजार्‍यांत धुमश्चक्री

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर, पुढारी वृत्तसेवा : करंजे (ता. बारामती) येथे मंगळवारी (दि. 19) सकाळी मंदिरातील पुजार्‍यांच्या दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. वादाचे पर्यवसान जोरदार मारहाणीत झाले. भाविकांच्या देखत हा प्रकार सुरू होता. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून, दोन्ही बाजूंच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला.

एका गटाकडून महिलेने फिर्याद दिली. तिचा पती व दोन मुले यांना राजेंद्र अरुण भांडवलकर, अरुण पांडुरंग भांडवलकर, विनोद विलास भांडवलकर, अपर्णा राजेंद्र भांडवलकर, विवेक विलास भांडवलकर (सर्व रा.दे ऊळवाडी, करंजे) यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दमदाटी व शिवीगाळ केली. विनोद भांडवलकर यांनी फिर्यादीचा डावा हात ओढत विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. दुपारी एक वाजता होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली असता वरील सर्व आरोपींनी पुन्हा तेथे फिर्यादीच्या पतीला व दोन्ही मुलांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

दुसर्‍या बाजूनेही महिलेनीच फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, सोमेश्वर मंदिरात देवाच्या पाया पडण्यास जात असताना सागर भांडवलकर, पंकज भांडवलकर, बाळासो भांडवलकर हे त्यांचे दुकान मंदिरासमोर लावत होते. त्यावेळी सागर व पंकज यांनी शिवीगाळ, दमदाटी करून पंकज भांडवलकरने विनयभंग केला. सागरने केस धरून रस्त्यावरून ओढले, बाळासो भांडवलकरने पोटात लाथा मारून शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून वडगाव पोलिसांनी सागर बाळासो भांडवलकर, पंकज बाळासो भांडवलकर, बाळासो विश्वनाथ भांडवलकर व एक महिला (रा. सर्व देऊळवाडी, करंजे) यांच्यावर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार करीत आहेत.

वाद सोडविण्याऐवजी व्हिडीओ शूटिंग

सोमेश्वर मंदिरातील हा वाद भाविकांसमोरच झाला. वाद सोडवण्याऐवजी अनेकांनी त्याचे व्हिडीओ शूटिंग केले. ते समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर देवस्थानचा विकास झाला, परंतु विविध कारणांनी येथे वाद होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT