पुणे

पुणे : ‘सीईटी’ परीक्षांचा निकाल सप्टेंबरमध्ये; संभाव्य वेळापत्रक जाहीर

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलकडून घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचा निकाल सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर होणार आहे. उच्च शिक्षण अंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमांचा निकाल 10 सप्टेंबर, तर एमएचटी सीईटीचा निकाल 15 सप्टेंबरपर्यंत जाहीर होणार आहे. विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना 2 ऑगस्टपासून सुरुवात झाली. तांत्रिक अडचणी, अतिवृष्टी अशा विविध संकटांचा सामना करीत या परीक्षा सीईटी सेलकडून यशस्वीरीत्या घेण्यात आल्या.

सर्व्हरमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि अतिवृष्टीमुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नव्हते, अशा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सीईटी सेलकडून त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार एलएलबी पाच वर्षे आणि तीन वर्षे, बीएड-एमएड, बीपीएड, एमएड, बीएबीएस्सी बीएड, बी-प्लानिंग आणि एमसीए या अभ्यासक्रमांची पुन: परीक्षा 27 ऑगस्टला, तर एमएचटी सीईटीच्या परीक्षा 29 ऑगस्टला घेण्यात आली.

एमएचटी सीईटीचा निकाल 15 सप्टेंबरपर्यंत…
अभियांत्रिकी कृषी वैद्यकीय औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल 15 सप्टेंबर किंवा त्यापूर्वीच जाहीर होणार आहे. एमएचटी सीईटी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटीच्या संकेतस्थळावर 1 सप्टेंबर रोजी उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. 2 ते 4 सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांच्या तक्रारी संकेतस्थळावर दिलेल्या लिंकमधून भरायच्या आहेत. त्यानंतर 15 सप्टेंबर किंवा त्यापूर्वीच निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT