पुणे

पुणे : शिर्‍या वाघमारे टोळीवर मोक्का

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: उत्तमनगर आणि वारजे परिसरात दहशत माजविणार्‍या गणेश ऊर्फ शिर्‍या वाघमारे व त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ही 91 वी कारवाई आहे. श्रीगणेश ऊर्फ शिर्‍या वाघमारे (वय 21), सचिन शंकर दळवी (वय 23), सूरज राजू मारूडा (वय 21), रखमाजी परमेश्वर जाधव (वय 19), प्रतीक संजय नलावडे (वय 21) व समीर ऊर्फ अरब्या नरहरी कांबळे (वय 18) अशी कारवाई केलेल्या टोळीचे नाव आहे. श्रीगणेश ऊर्फ शिर्‍या हा टोळीप्रमुख आहे. टोळीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता.

वारजे व उत्तमनगर परिसरात टोळीचे वर्चस्व राखण्यासाठी व आर्थिक फायद्यासाठी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी यांसारखी गंभीर गुन्हे केल्याचे दिसून आले. गुन्हेगारी कृत्याने सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा निर्माण झालेली आहे. प्रतिबंधक कारवाईनंतरदेखील ते गुन्हे करीत होते. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी टोळीवर मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्यामार्फत अप्पर पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे पाठविला होता.

SCROLL FOR NEXT