पुणे

पुणे : वीजबिल भरणा केंद्रे शनिवारी, रविवारी सुरू

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे शनिवारी (दि. 30) व रविवारी (दि. 31) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. वारंवार आवाहन करूनही थकबाकीचा भरणा करीत नाहीत, अशा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे परिमंडलातील महावितरणची अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सार्वजनिक सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवारी (दि. 30) व रविवारी (दि. 31) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या चालू व थकीत बिलांचा भरणा करण्यासाठी वेबसाईट, तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन सोय उपलब्ध आहे. वीजबिल 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना 'आरटीजीएस' किंवा 'एनईएफटी'द्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT