पुणे

पुणे : वडगाव बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरात कचरा

अमृता चौगुले

खडकवासला, पुढारी वृत्तसेवा : वडगाव बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरात कचऱ्याच्या वाढत्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत.

अनेक दिवसांपासून स्मारका समोरच कचराकुंडी भरुन वाहत होती याकडे मनसेचे कार्यकर्ते चंदन कड पाटील यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तातडीने कचरा कुंडी हटविण्यात आली मात्र परिसरात कचऱ्याची समस्याकायम आहे. परिसरातील कचरा वेळेवर उचलून सफाई करण्यात यावी अशी मागणी कड यांनी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त आणि सिंहगड क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त यांना केली आहे.

स्मारक परिसरात रिक्षा, टेम्पो स्टँड आहे.तसेच गणेश मंदिर, बस स्थानक, उद्यान, जॉगिंग ट्रॅक भाजी मंडईचा आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. जॉगिंग ट्रॅकचा वापर करतात. असे असताना या परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे.

SCROLL FOR NEXT