पुणे

पुणे : लाखोंच्या वाईनच्या बाटल्या लांबविल्या

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत : गोदामाची भिंत फोडून चोरट्यांनी साडेबारा लाखांच्या वाईनच्या बाटल्यांची खोकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. सासवड रस्त्यावर ही घटना घडली. याबाबत वाईन एंटरप्रायजेस प्रा. लि. चे संतोष केशवे (वय 33, रा. शेवाळवाडी) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सासवड रस्त्यावरील वडकी, उरुळी देवाची, मंतरवाडी भागात गोदामे आहेत. गोदामांमध्ये विविध कंपन्यांच्या मालाची साठवणूक केली जाते.

सासवड रस्त्यावरील श्रीनाथ एंटरप्रायजेस गोदामात केशवे यांच्या कंपनीच्या वाईनची खोकी ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी गोदामाची भिंत मध्यरात्री फोडली. गोदामातील वेगवेगळ्या कंपनीच्या वाईनच्या बाटल्या खोक्यात ठेवण्यात आल्या होत्या. चोरट्यांनी वाईनच्या बाटल्यांची खोकी लांबविली. चोरट्यांनी 12 लाख 65 हजारांच्या बाटल्या लांबविल्या आहेत.

SCROLL FOR NEXT