पुणे

पुणे : राजगुरुनगर शहरात स्टॅम्पपेपरचा तुटवडा

अमृता चौगुले

राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा : खेड तहसील कार्यालय परिसरात असलेल्या स्टॅम्प विक्रेत्यांकडे स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक विक्रेते चढ्या भावाने स्टॅम्पची विक्री करतात, असा आरोप होत आहे.

एका राजकीय पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना निष्ठेची प्रतिज्ञापत्रे सादर करण्यास सांगितल्याने, त्यासाठी समर्थक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या स्टॅम्पची खरेदी केली आहे. विक्रेत्यांकडील स्टॅम्पचा कोटा यामुळे संपला आहे. ज्यांच्याकडे शिल्लक आहेत, असे विक्रेते चढ्या भावाने ही विक्री करीत आहेत. यामुळे मात्र विविध कामांसाठी आवश्यक असताना स्टॅम्प मिळवताना विद्यार्थी, पालक हैराण झाले आहेत.

शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. हे प्रवेश अर्ज दाखल करताना विविध दाखल्यांसाठी पालकांना प्रतिज्ञापत्र लागतात. कर्ज प्रकरणात तसेच करारनामा करताना स्टॅम्पपेपर आवश्यक आहे. मात्र, याच काळात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत.

– अ‍ॅड. संदीप भोसले ,ज्येष्ठ विधिज्ञ, राजगुरूनगर

SCROLL FOR NEXT