पुणे

पुणे : मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ

अमृता चौगुले

पुणे : शहरात मोबाईल जबरी चोरीच्या घटना वाढल्या असून, एकाच दिवशी विविध पोलिस ठाण्यांत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अलंकार, विश्रांतवाडी, हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. मनोज जनार्धन माझिरे (40, रा. गणेशनगर, एरंडवणे) हे 30 जुलै रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एरंडवणा येथील कॅनॉल रोडजवळील गांधी लॉन्स येथून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांचा मोबाईल चोरून नेला, तर डेक्कन कॉलेज ते विश्रांतवाडी रोडवर मानसी महेश बागवे (40, रा. सैप्रस, आळंदी रोड, विश्रांतवाडी) या पायी मोबाईलवर बोलत चालल्या होत्या.

दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांचा मोबाईल हिसकावून नेला. याबाबत विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याबाबत सोहन आनंदाराम चौधरी (28, रा. काळुबाईनगर, थिटे वस्ती, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. चौधरी साडेसतरानळी येथून जात असताना त्यांचा दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोबाईल चोरून नेला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT