पुणे

पुणे : मेट्रोची ऑपरेशन कंट्रोल रूम सज्ज; मेट्रो ट्रेनसह ट्रॅकवर 24 तास असणार नजर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मेट्रो पुणे शहरात सुरू झाल्यानंतर तिच्यावर देखरेख ठेवण्यासाठी महत्त्वाची असलेली ऑपरेशन कंट्रोल रूम आता सज्ज झाली आहे. लवकरच मेट्रो सुरू झाल्यानंतर या कंट्रोल रूमद्वारे मेट्रोच्या प्रत्येक बारीकसारिक गोष्टींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. महामेट्रो प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेली कंट्रोल रूम आणि तिची कार्यप्रणाली मंगळवारी दुपारी पत्रकारांना दाखवण्यात आली.

या वेळी मेट्रोच्या अधिकार्‍यांनी या कंट्रोल रूमचे उद्देश, कार्य, त्याद्वारे काय काम होणार याची माहिती दिली. या वेळी संचालक अतुल गाडगीळ, सिस्टीम डायरेक्टर विनोद अग्रवाल, महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांच्यासह अरुण धार्मिक, परम सिंग मीना, संतोष कुमार, राजीव कुमार, राजेश द्विदी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

सोनवणे म्हणाले, 'या कंट्रोल रूमद्वारे मेट्रो ट्रेनच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच मेट्रो मार्ग फायर सिस्टीम तांत्रिक प्रणाली या सर्व स्थानकांवर देखील बारीक लक्ष ठेवता येणार आहे. यामुळे भविष्यात होणारी एखादी मोठी दुर्घटना कंट्रोल रूममध्ये बसून देखील रोखता येऊ शकते.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT