पुणे

पुणे : मुठा कालव्यावरील रस्ता उकरून ठेवल्याने समस्या

अमृता चौगुले

यवत, पुढारी वृत्तसेवा : केडगाव येथील नवीन मुठा उजवा कालव्यावर असणार्‍या फाटा क्रमांक 23 चा रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली उकरून ठेवल्याने या ठिकाणाहून ये-जा करणार्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. केडगावमध्ये जलसंपदा विभागाच्या चुकीमुळे रस्ता अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अगोदरच छोटा भराव असून, त्यात जलसंपदा विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली या ठिकाणीही माती उकरली आहे. परिणामी, पावसामुळे या ठिकाणी मोठे भगदाड पडले आहे. या ठिकाणाहून मुलांच्या शाळेच्या बस तसेच शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने ये-जा करीत असतो. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला जलसंपदा विभाग जबाबदार असेल, असा इशारा येथील शेतकर्‍यांनी
दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT