पुणे, पुढारी वृत्तसेवा: मुंढव्यातील दोन हॉटेलमध्ये अवैधपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली. याप्रकरणी हॉटेल मालक आणि चालकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताडीगुत्ता चौकातील बॉटल फॉरेस्ट आणि धायरकर कॉलनी पिंपळे वस्ती येथील ब्ल्यू शॅक या दोन हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली.
हॉटेल मालक रोहित किसन (वय 29, रा. घोरपडी गाव), अभय दिवाकर मिश्रा (वय 41, रा. मुंबई कुर्ला), विकास मेन्शन आणि व्यवस्थापक, वेटर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही हॉटेलमधून हुक्का फ्लेवर, स्पॉट असा 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड हे पथकासह गस्तीवर असताना, हॉटेल बॉटल फॉरेस्ट व ब्ल्यू शॅक येथे ग्राहकांना अवैध पद्धतीने हुक्का पिण्यासाठी दिला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.