पुणे

पुणे : मित्राच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला

अमृता चौगुले

पुणे : चार वर्षांपूर्वी एका आजोबांना कामानिमित्त उसने दिलेले 50 हजार रुपये त्यांनी परत न केल्याने मित्राने त्यांच्या नातवाकडे पैशाची मागणी केली. मात्र, नातवाने पैसे न देता थेट मित्राच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा
प्रयत्न केला.

हडपसर परिसरात हा प्रकार घडला. या घटनेत अम्मार मुक्तार शेख (वय 28, रा. हडपसर, पुणे) हा तरुण जखमी झाला असून, त्याने आरोपींविरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी साहिल शेख (वय 22), नौमान सय्यद, जमीर शेख (तिघे रा. हडपसर, पुणे) यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ही घटना 26 जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास हडपसरमधील रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. तक्रारदार अम्मार शेख व साहिल शेख हे एकमेकांचे मित्र आहेत. अम्मारने साहिल शेख यांच्या आजोबांना चार वर्षांपूर्वी 50 हजार रुपये उसने दिले होते. हे पैसे परत न दिल्याने अम्मार पैसे मागण्यासाठी गेला. त्या वेळी साहिल व त्याच्या मित्रांनी अम्मारसोबत वाद घालून त्याच्यावर कोयत्याने वार केले.

SCROLL FOR NEXT