पुणे

 पुणे : माजी सैनिक महिला बचत गटाला कल्याणकारी निधीतून अनुदान

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते गोपेश्वर महिला बचत गट हडपसर व जय जवान महिला बचत गट हडपसर यांना धनादेश प्रदान करण्यात आले. माजी सैनिक महिला बचत गट उपक्रमाअंतर्गत पीएमपीएल प्रवासी वाहतूक बससाठी कल्याणकारी निधीतून शासनातर्फे मंजूर असलेल्या 10 लाख रुपये अनुदानापैकी 3 लाख रुपयांचा धनादेश त्यांना प्रदान करण्यात आला. या वेळी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अजय पवार, कल्याण संघटक दीपक शेळके, अविनाश ढोले, पांडुरंग नवले, तसेच दोन्ही महिला बचत गटांचे पदाधिकारी उपस्थित होते.

माजी सैनिकांच्या पत्नी, तसेच विधवांनी मिळून बचतगट तयार केले असून, त्याची नोंदणी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे केली आहे. महिलांना व्यवसाय, तसेच रोजगाराला चालना देण्यासाठी अनुदान देण्याची योजना आहे. या अनुदान योजनेअंतर्गत हडपसर येथील या दोन्ही महिला बचत गटांनी बस खरेदी केली आहे. ही बस पीएमपीलला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. यासाठी या महिलांनी काही प्रमाणात बचतगटाचे, तर काही बँकेकडून भांडवल घेतले आहे..

SCROLL FOR NEXT