पुणे : दुचाकीवरून निघालेल्या महिलेच्या गळ्यातील 30 हजार रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावली. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गंगाधाम रोडवर कोंढवा येथे घडली. याप्रकरणी कोंढवा बु. येथील 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, कोंढवा पोलिसांनी तिघा दुचाकींवरील चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ह्या त्यांच्या दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्या वेळी समोरून दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसका मारून पळवली.