पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'भारताचा तिरंगा ध्वज हा आपल्या आत्मविश्वासाचे, आत्मभानाचे, आत्मतेजाचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट रोजी आपला तिरंगा ध्वज घरावर फडकवावा आणि यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित स्वराज्य महोत्सव व 'हर घर तिरंगा' कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियानाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सिद्धार्थ शिरोळे, शिवेंद्रराजे भोसले, सुनील कांबळे, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, आयोजन समिती अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करण्याचे हे एक माध्यम आहे. या माध्यमातून ज्ञानाधारित समाजव्यवस्था निर्माण करायची आहे. केवळ शिक्षित समाज निर्माण करून उपयोगाचे नाही, तर विद्यार्थ्यांची वाटचाल ज्ञानाकडे व्हायला हवी आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे समग्र व्यक्तिमत्त्व घडायला हवे. राष्ट्र घडविण्यासाठी समाजाविषयी जाणीव असलेले विद्यार्थी निर्माण करणारी व्यवस्था अनुकूल परिवर्तन घडवू शकते.
हा सर्वांसाठी अभिमानाचा क्षण असणार आहे. या उपक्रमासोबत स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणार्या अनामिक स्वातंत्र्यसैनिकांना शोधून नव्या पिढीपुढे आणण्याची आवश्यकता आहे.' पाटील म्हणाले, 'स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरोघरी तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले. त्याअंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विश्वविक्रमाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. देशाविषयी अभिमानाची भावना आणि देशभक्तांच्या त्यागाविषयीची जाणीव तरुणांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे.' कुलगुरू डॉ. काळे यांनी स्वागतपर भाषण केले. प्रास्ताविक आयोजन समिती अध्यक्ष राजेश पांडे यांनी केले.