पुणे

पुणे : मनसेचा स्वबळावर लढण्याचा इरादा!

अमृता चौगुले

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सदस्य नोंदणीच्या मोहिमेतून पक्षाची ताकद वाढविण्याकडे लक्ष देताना स्वबळावरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. मनसेचा फटका कोणाला बसणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वक्तृत्व, विरोधकांवर घणाघाती हल्ले करणारे मुद्दे आणि रोखठोक भूमिका, हीच पक्षाची खरी ताकद. गुढीपाडव्याला त्यांनी मशिदीवरील भोंग्याला उत्तर देण्यासाठी त्यासमोर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी भोंगे लावण्याचे आवाहन केले. देशभर वादळ उठले. दोन महिने त्याचे पडसाद उमटत राहिले.

पुण्यातील सदाशिव पेठेत हनुमान जयंतीला आरती करताना कार्यकर्त्यांनी त्यांना हिंदू जननायक ही उपाधी दिली. त्या वेळी त्यांनी अयोध्या दौरा जाहीर केला. त्यांचा न झालेला अयोध्या दौराही भाजपच्या खासदाराने विरोध केल्याने गाजला. त्यानंतर ठाकरे यांच्या पायावरील शस्त्रक्रियेने ते दोन महिने जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. राज ठाकरे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर हल्ला चढवितानाच राष्ट्रवादी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य बनविले होते. त्यांची भूमिका भाजपला पूरक ठरू लागल्याची चर्चा त्या वेळी सुरू झाली होती. त्यांची युती होणार, अशीही चर्चा होती. मात्र, ठाकरे यांनी त्या संदर्भात भाष्य कधी केले नव्हते.
राजकीय वातावरणात मोठे उलटफेर अन् मनसेची गोची..

गेल्या महिन्यात राज्यातील राजकीय वातावरणात मोठे उलटफेर झाले अन् मनसेची गोची झाली. शिवसेना फुटली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाची भाजपसोबत आघाडी झाली. त्यामुळे भाजप व मनसे निवडणुकीत एकत्र येणार की नाही, ही चर्चा हवेतच विरली. मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेट घेतली. मात्र, राज्यातील अनेक राजकीय वादांवरील याचिका आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्या निकालानंतरच पुढील निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट होईल.

ही राजकीय स्थिती लक्षात घेता राज ठाकरे यांना पुढील वाटचाल ठरवावी लागणार आहे. त्यांनी मुंबईत सभा घेतली, तर पुण्यात गुरुवारी पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात केली. पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढली, असा सल्ला ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात काही शहरांत त्यांची अन्य पक्षांशी युती होऊ शकेल; तसेच उमेदवारी डावललेले अन्य पक्षांचे तुल्यबळ इच्छुक मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.

राजकीय वातावरणात मोठे उलटफेर अन् मनसेची गोची..
गेल्या महिन्यात राज्यातील राजकीय वातावरणात मोठे उलटफेर झाले अन् मनसेची गोची झाली. शिवसेना फुटली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाची भाजपसोबत आघाडी झाली. त्यामुळे भाजप व मनसे निवडणुकीत एकत्र येणार की नाही, ही चर्चा हवेतच विरली. मध्यंतरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन भेट घेतली. मात्र, राज्यातील अनेक राजकीय वादांवरील याचिका आता सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.

त्या निकालानंतरच पुढील निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट होईल. ही राजकीय स्थिती लक्षात घेता राज ठाकरे यांना पुढील वाटचाल ठरवावी लागणार आहे. त्यांनी मुंबईत सभा घेतली, तर पुण्यात गुरुवारी पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात केली. पक्षाची बार्गेनिंग पॉवर वाढली, असा सल्ला ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात काही शहरांत त्यांची अन्य पक्षांशी युती होऊ शकेल; तसेच उमेदवारी डावललेले अन्य पक्षांचे तुल्यबळ इच्छुक मनसेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात.

22 जागांवर लक्ष
मनसे पुण्यात स्वबळावर लढल्यास अनेक प्रभागांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. प्राथमिक टप्प्यात त्यांनी बावीस जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. या जागांवर त्यांना यश मिळेल, असा पक्षाचा अंदाज आहे. त्यांनी मे-जूनमध्ये पक्षबांधणीनंतर उमेदवारांची नावे निश्चित करण्यास प्रारंभ केला. मनसेने प्रमुख उमेदवार, काही प्रभागांतील तिघांचे संभाव्य पॅनेल ठरविल्याने त्यांनी प्रभागात बांधणीला प्रारंभ केला आहे. मनसेने नवे चेहरे रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे.

राजकीय पक्षांना फटका
मनसे स्वबळावर लढल्यास त्याचा फटका भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांना कोथरूड मतदारसंघात अधिक बसण्याची शक्यता आहे. तेथे तीन-चार प्रभागांत मनसेची ताकद आहे. शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार यांच्या प्रभागात मनसेचे किशोर शिंदे निवडणूक लढवू शकतात. त्याचबरोबर विरोधकांनाही मतविभागणीचा फटका कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बसू शकतो. कँाग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या प्रभागात मनसेचे प्रल्हाद गवळी लढण्याच्या तयारीत आहेत. अशी स्थिती अन्य काही प्रभागांतही आहे. अन्य मतदारसंघांतही काही प्रभागात मनसेचे तरुण कार्यकर्ते लक्षणीय मते घेण्याची शक्यता आहे.

मराठी अस्मिता
हिंदुत्व व मराठी अस्मिता हे मुद्दे घेत मनसेचे मार्गक्रमण सुरू झाले आहे. त्याचा फायदा शिवसेनेबरोबरच भाजपची मतेही खेचण्यासाठी मनसेला उपयोगी ठरणार आहेत. मुंबईत भाजपला मनसे उमेदवारांच्या मतविभागणीचा फायदा होण्याची शक्यता आहे. पुण्यात मात्र भाजपला त्याचा फटका बसू शकतो. दहा वर्षांपूर्वी मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले होते. त्यांचे काही माजी नगरसेवक यंदा तयारीने रिंगणात उतरू शकतात. शेवटच्या टप्प्यात हिंदुत्वाचा मुद्दा प्रचारात अग्रभागी ठेवत मनसे जास्त जागा मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT