पुणे

पुणे : भुकूममध्ये घरांत घुसले पाणी

अमृता चौगुले

पिरंगुट, पुढारी वृत्तसेवा : भुकूम येथे राम नदीलगत झालेल्या अनधिकृत प्लॉटिंगमधील बांधकामांची भिंत राम नदीत कोसळल्याने घरांमध्ये पाणी घुसले आहे. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर या कुटुंबांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.

गेले पाच वर्षांपासून भुकूम आणि परिसरामध्ये अनधिकृत प्लॉटिंगच्या अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. अनधिकृत प्लॉटिंग आणि त्यानंतर त्यावर होत असलेली अनधिकृत बांधकामे याकडे पीएमआरडीए जाणून-बुजून डोळेझाक करीत आहे. त्याचा परिणाम आज दिसून आला.

गेले तीन दिवस या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून, त्याचाच परिणाम नदीने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. आज दोन तास रेस्क्यू ऑपरेशन करून येतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. या सर्व गोष्टींकडे महसूल विभाग पीएमआरडीए यांनी जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

SCROLL FOR NEXT