पुणे

पुणे : बाल तबलावादक सोहम गोराणेला चौरासिया शिष्यवृत्ती

अमृता चौगुले

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : आळंदी देवाची येथील बाल तबलावादक सोहम गोराणे याला तबला या विषयामध्ये गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित पद्मविभूषण पं. हरिप्रसादजी चौरासिया शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.

गुरुकुल प्रतिष्ठान, ठाणे या संगीतात कार्यरत असणार्‍या संस्थेतर्फे कलासाधक विद्यार्थ्यांना संगीत शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षी 13 कलासाधक विद्यार्थ्यांना जगविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसादजी चौरासिया यांच्या नावाने दिली जाणारी शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. ही शिष्यवृत्ती दि.17 रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे देण्यात येणार असल्याचे बासरीवादक विवेक सोनार यांनी जाहीर केले.

सोहम गोराणे याचे तबलावादनाचे शिक्षण पं. योगेश समसी यांचेकडे चालू आहे. सोहमने आजपर्यंत अनेक जगप्रसिद्ध कलाकारांसोबत तबलासाथसंगत तसेच जुगलबंदी केली आहे. सोहम हा तबलावादक शामजी गोराणे व गायिका ज्योती गोराणे याचा मुलगा आहे.

SCROLL FOR NEXT