पुणे

पुणे : पॉवरविडर ठरतेय शेतकर्‍यांना वरदान

अमृता चौगुले

दिवे, पुढारी वृत्तसेवा : दिवे परिसरात फळबागांची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, यंदा संततधार पावसाने फळबागांमध्ये तणांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशावेळी फळबागायतदारांना तणनिर्मूलन व आंतरमशागतीसाठी पॉवरविडर या आधुनिक यंत्राचा मोठा लाभ होत आहे. कमी वेळेत व खर्चात आंतरमशागतीसाठी पॉवरविडर वरदान ठरत आहे.

फळबागेतील आंतरमशागतीसाठी बहुतांश ठिकाणी त्याचा वापर वाढला आहे. ते आकाराने लहान असल्याने फळबागांमध्ये अत्यंत प्रभावी ठरत आहे. शिवाय कृषी विभागाकडून हे अवजार खरेदीसाठी अनुदानही उपलब्ध आहे. त्यामुळे बरेच शेतकरी याचा वापर करू लागले आहेत. वजनाने हलके असल्याने हाताळायला सोपे असे हे अवजार बैल अथवा ट्रॅक्टरला पर्याय ठरत आहे. कृषी विभागाकडून
अनुदानावर पॉवरविडर शेतकर्‍यांसाठी उपलब्ध आहे, असे कृषी सहायक योगेश पवार यांनी सांगितले.

शेतकर्‍यांनी कृषी खात्याच्या महाडीबीटी वेबसाईटवर अर्ज केल्यास ड्रॉ पद्धतीने पात्र शेतकर्‍यांची निवड होते. नंतर शेतकर्‍यांना पूर्वसंमती दिल्यावर खरेदी केल्यास, पाहणी करून थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान जमा केले जाते. जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा.

– गणेश जगताप, कृषी पर्यवेक्षक, सासवड.

SCROLL FOR NEXT