file photo  
पुणे

पुणे : पुढील आठवडाभर राज्यात मुसळधार पाऊस

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या सर्वच भागात पुढील आठवडाभर पाऊस चांगलाच जोर धरणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडणार आहे. याबरोबरच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भाच्या बहुतांश भागात पाऊस चांगली हजेरी लावण्याचा अंदाज आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या
आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली.

मात्र, त्यानंतर सुमारे तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने उघडीप दिली. त्यामुळे पुन्हा कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. बुधवारपासून राज्यात पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. अर्थात मध्य-पूर्व बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेशापर्यंत चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पाऊस वाढला आहे. याबरोबर 7 ऑगस्टच्या आसपास बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळेच राज्यात पाऊस वाढणार आहे.

यलो अलर्ट पुढील पाच दिवस
पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नांदेड, नगर, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा, वाशीम , यवतमाळ

ऑरेंज अलर्ट (5 ते 8 ऑगस्ट)

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT