पुणे

पुणे : पीएमपी चालकाला बेदम मारहाण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वाहतूक कोेंडीत कारला जाण्यास जागा न दिल्याने कारचालक आणि साथीदारांनी पीएमपी चालकाला मारहाण केल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावर घडली. याप्रकरणी मोटारचालकासह चौघांविरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. याप्रकरणी मोटारचालक नीलेश कटके (वय 26), कविता राजेश कटके (वय 44), नितीन जयपाल कटके (वय 47, तिघे रा. श्रीकृष्ण सोसायटी, गुलटेकडी) तसेच एका अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीएमपी चालक लक्ष्मण सुभाष धुमाळ (वय 41, रा. अंजनीनगर, कात्रज) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आळंदी ते स्वारगेट या मार्गावरील पीएमपी बस स्वारगेटकडे जात होती. शंकरशेठ रस्त्यावरील मीरा सोसायटीजवळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्या वेळी कारला पुढे जाण्यास जागा न दिल्याने कारचालक निखिल कटकेने पीएमपी चालक धुमाळ आणि वाहक अतुल कुलकर्णी यांना शिवीगाळ केली. निखिल आणि साथीदार पीएमपी बसमध्ये शिरले. त्यांनी पीएमपी चालक धुमाळ आणि वाहक कुलकर्णी यांना शिवीगाळ केली. कठीण वस्तूने धुमाळ यांना मारहाण केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT