पुणे

पुणे : परकीय चलनामध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: परकीय चलनामध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला 19 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी दिली आहे. शशांक दिनेशभाई पराडिया (रा. अहमदाबाद) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात आणखी दोघांवर गुन्हा दाखल आहे.

याबाबत 63 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादींच्या मोबाईलवर फोन केला. फॉरेक्स फॅक्टरी करन्सी ब्रोकर व अ‍ॅडव्हायजर असल्याचे सांगून फिर्यादींना एका खात्यात रक्कम भरण्यास भाग पाडले. भरलेली रक्कम 2 लाख 8 हजार 500 रुपये आणि नफ्यासह मिळून 4 लाख 42 हजार 755 रुपये न देता फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. अधिक तपासासाठी पोलिस कोठडी देण्याची सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी मागणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT