पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा- निमित्त उजनी धरणाला करण्यात आलेल्या तिरंगी विद्युत रोषणाईचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला. हाच व्हिडिओ आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टि्वटरवर पोस्ट केला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल झाला.
शनिवारी पंतप्रधानांनी टि्वटरवर धरणाचा व्हिडिओ पोस्ट करताना 'हे जलशक्ती आणि देशभक्तीचे उत्तम मिश्रण आहे!' अशी कॅप्शनदेखील दिली. दरम्यान, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. सांडव्यावर सोडण्यात आलेल्या पाण्यावर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगातील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. धरणाच्या पाण्यातील तिरंगा पाहण्यासाठी रात्रीच्या वेळी उजनीवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.