पुणे

पुणे : नोकरीच्या आमिषाने सतरा लाखांचा गंडा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुणे महापालिकेत लिपिकाची नोकरी लावण्याच्या आमिषाने दोन महिलांसह चौघांची साडेसतरा लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी संतोष शांतीलाल वाल्हेकर (रा. ताडीवाला रस्ता) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शुभांगी भिकाराम पोटे (वय 36, रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाल्हेकर याच्याशी पोटे यांची ओळख झाली होती. वाल्हेकरने पोटे, त्यांची भावजय सईंद्रा वाजे, तसेच परिचित रोहन जाधव आणि आकाश गायकवाड यांना पुणे महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी वाल्हेकर याने वेळोवेळी त्यांच्याकडून साडेसतरा लाख रुपये घेतले होते.
पैसे घेतल्यानंतर वाल्हेकरकडे त्यांनी नोकरीबाबात विचारणा केली, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोटे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक गुरव तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT